प्राचीन तीर्थंकर परंपरा आणि महावीर
प्राचीन तीर्थंकर परंपरा आणि महावीर - September 06, 2020 मध्यमपावाची धर्मपरिषदेत कैवल्याज्ञानी भगवान महावीरांनी पारंपरिक वैदिक धर्माला आव्हान दिले. अकारा वैदिक पंडित आणि त्यांच्या ४४०० शिष्यांनी त्यांच्याकडून प्रव्रज्या स्वीकारली. ही घटना जैन परंपरेचा एक संस्थात्मक धर्म म्हणून उद्घोषच होता. मात्र जैन साहित्य व इतिहास यांचे अवलोकन केले असता,महावीरांच्या फार पूर्वीपासून जैन परंपरा अस्तित्वात होती. अशी मांडणी सातत्याने जैन अभ्यासकांनी आणि तशीच काही विदेशी अभ्यासकांनी केली आहे. जैन परंपरा आपल्या अतिप्राचीनत्वाचा जो दावा करते. त्याच्यासाठी या परंपरेने दिलेल्या प्रमाणांचा आढावा घेणे आवश्यक ठरते. महावीरांना जैन धर्माचे २४ वे आणि अखेरचे तीर्थंकर मानले जाते. तीर्थंकर ही संकल्पना यासाठी पाहावी लागते. जैन धर्माच्या ऐतिहासिक धारणेप्रमाणे कालचकाचे दोन भाग करण्यात आले आहे. पहिला म्हणजे क्रमशः विकसित होत जाणारा म्हणजेच उत्सर्पिणी काल आणि दुसरा म्हणजे क्रमशः -हास होत जाणारा म्हणजेच अवसर्पिणी काल. कालचक रथाच्या चाकाप्रमाणे खालून वर आणि वरून खाली म्हणजेच अवनतीकडून उन्नतीकडे आणि उन्नतीकडून अवनतीकडे फ...