कोतवाल (पक्षी) कोतवली याच्याशी गल्लत करू नका. कोतवाल (पक्षी) शास्त्रीय नाव डायक्रुरस माक्रोसर्कस (Vieillot) कुळ कोष्ठपालाद्य (डायक्रुरिडी) अन्य भाषांतील नावे इंग्लिश Black Drongo संस्कृत कोष्ठप हिंदी कोतवाल वर्णन कोतवाल पक्षी हा साधारण ३१ सें. मी. आकाराचा संपूर्ण काळ्या रंगाचा, सडपातळ, चपळ पक्षी आहे. लांब, दुंभंगलेली शेपूट हे याचे वैशिष्ट्य. कोतवाल नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी संरक्षणार्थ कावळे , ससाणे सारख्या मोठ्या, हिंस्र पक्ष्यांच्या मागे लागून त्यांना पळवून लावतात म्हणून यांच्या आश्रयाने इतर लहान-मोठे पक्षी आपले घरटे बांधतात. या कामावरून यांचे नाव कोतवाल पडले असावे. आवाज संपादन करा कोतवाल (पक्षी) आवाज ( सहाय्य · माहिती ) वास्तव्य/आढळस्थान कोतवाल (पक्षी) संपूर्ण भारतभर आढळतो तसेच ईराणसह , पाकिस्तान , बांगलादेश , म्यानमार , श्रीलंका , चीन , इंडोनेशिया या देशांमध्येही याचे वास्तव्य आहे. हे पक्षी एकट्याने किंवा लहान-मोठ्या थव्याने शेतीच्या भागात आणि मोकळ्या मैदानी प्रदेशात राहणे पसंत करतात. हे सहसा विद्युत तारांवर किंवा गुरांच्या कळपात राहून विविध कीट पकडू
Comments
Post a Comment